बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक अरजित सिंग ( Arjit Sing) याचा आज वाढदिवस आहे. आपल्या मधून आवाजाने अरजित सिंगने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सांवरिया या चित्रपटामधून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र आशिकी २ ने त्याला मोठे यश दिले. प्रेमाची गाणी गाऊन ( Love Songs) अरजित आयुष्यात यशस्वी झाला. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्याच्या प्रमाचे तीन तेरा वाजले आहेत.
Yogi Adityanath : ब्रेकिंग! योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी
करिअरच्या अगदी सुरुवातीला अरजित सिंग रिअॅलिटी शो मध्ये सहभागी होत होता. दरम्यान २०१३ मध्ये तो ‘फेम गुरुकुल’ या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी तो त्याची सह-स्पर्धक रुपरेखा बॅनर्जीच्या (Ruprekha Banergy) प्रेमात पडला. पुढे जाऊन या दोघांनी लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही अन् एकाच वर्षात अरजित सिंग व रूपरेखा बॅनर्जी वेगळे झाले.
यानंतर अरजित सिंगने २०१४ मध्ये त्याची लहानपणीची मैत्रीण कोयल रॉय ( Koyal Roy) सोबत लग्न केले. महत्त्वाची बाब म्हणजे कोयल त्यावेळी घटस्फोटित होती व तिला एक मुलगा देखील होता. अरजित सिंगने त्याच्या दुसऱ्या लग्नाची बातमी खूप वेळ लपवून ठेवली होती. परंतु, एकदा एका मुलाखतीमध्ये त्याने या लग्नाबाबत सांगितले. अरजित सिंगनेच कोयलला लग्नासाठी प्रपोज केले होते.
Sanjay Raut: मोठी बातमी! संजय राऊत उद्या भीमा पाटस कारखान्यासमोर घेणार सभा