Site icon e लोकहित | Marathi News

वडील सचिन तेंडुलकरकडून मिळाले अर्जुनला आजवरचे सर्वोत्तम गिफ्ट!

Arjun got the best gift ever from his father Sachin Tendulkar!

मुंबई इंडियन्स हा संघ (Mumbai Indians) सलग तिसऱ्यांदा विजयी झाला आहे. हैदराबादमधील (Hyderabad) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमधे सनरायझर्स हैदराबाद(SRH) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) संघात आयपीएल IPL २०२३ चा २५ वा सामना खेळला गेला. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने १४ धावांनी विजय मिळविला, व सलग तिसऱ्यांदा विजयाचा झेंडा फडकवला.

Raj Thackeray: सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ सुरु असतानाच राज ठाकरेंना मोठा धक्का!

मुंबईसाठी अर्जुन तेंडुलकर याने अखेरच्या ओव्हर मध्ये उत्कृष्ट बॉलिंग केली. हा सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स ने प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार अर्जुन ला दिला. विशेष म्हणजे क्रिकेटचे जादूगार असणारे सचिन तेंडुलकर म्हणजेच अर्जुनचे वडील यांनी हा पुरस्कार अर्जुनला दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होत आहे.

शेतीपंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय!

शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादला २० धावांची गरज होती, ती ओव्हर अर्जुन ने खूप समजूतदारपणे पार पाडली. अर्जुनने फक्त ६ धावा दिल्या, व भुवनेश्वर कुमार च्या रूपाने IPL मधील पहिली विकेट अर्जुनला मिळाली. अर्जुनने मुंबईच्या विजयात महत्त्वाची कामगिरी केली. सामन्यामध्ये त्याने २.५ ओव्हर मध्ये फक्त १८ रन्स दिल्या आणि एक विकेट पटकावली.

३ लाख रुपये किमतीचा ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा!

प्रत्येक मॅच नंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूम वेगळा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार दिला जातो. यावेळी हा पुरस्कार स्वतः सचिन तेंडुलकर यांनी अर्जुनला प्रदान केला, व त्याचे भरभरून अभिनंदन केले. तेंडुलकर गंमतशीर म्हणाले की, “तेंडुलकर घरात आयपीएलची विकेट ही आली”. अर्जुनने केकेआर (KKR) विरुद्धच्या सामन्यामधून आपले आयपीएल करिअर सुरू केले होते. पण त्याला त्याच्या पहिल्या सामन्यात केवळ २ ओव्हर्स मध्ये १७ रन्स दिल्या होत्या. परंतु त्याला एकही बळी मिळवता आला नव्हता.

IPL २०२३ सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडूंची यादी, जाणून घ्या कोण आहेत?

Spread the love
Exit mobile version