मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सगळेच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असले तरी या यादीमध्ये पहिले नाव तिचे मिस्टर परफेक्ट म्हणजेच अर्जुन कपूरचे आहे. अभिनेत्याने मलायका अरोराला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा हे बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दरम्यान, आज मलायकाचा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये दोघे रोमँटिक शैलीत मिरर सेल्फी घेताना दिसत आहेत.
साखर उद्योगाला बुस्ट मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शेतकऱ्यांना दिला विशेष कृती आराखडा
पोस्ट शेअर करत अर्जुन कपूरने एक हटके कॅप्शन देखील लिहिले आहे. त्याने लिहिले की, “हॅपी बर्थडे बेबी,आनंदी राहा”. यावर चाहते जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. लोक भरभरून प्रेमाच्या शुभेच्छा देताना दिसतात. अभिनेत्री तारा सुतारियाने देखील शुभेच्छा दिल्या आहेत तर दिग्दर्शक अभिषेक कपूरने हॅपी बर्थडे मलायका असे लिहिले. मलायका आणि अर्जुन दोघेही बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे.
दूध उत्पादकांसाठी दिलासादायक! गाई दूध दरात 3 आणि म्हैस दरात 2 रुपयांनी वाढ