मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. क्रिकेट (Cricket) व्यतिरिक्त तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सध्या अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अर्जुनला बीसीसीआयने (BCCI) बोलावणं पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
गौतमी पाटीलच्या आईचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; पाहा video
बीसीसीआयने अर्जुन तेंडुलकरला बंगळुरुमधील एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट एकेडमीसाठी बोलावलं आहे. बीसीसीआयने अर्जुनसह एकूण 20 प्रतिभावान खेळाडूंना एनसीए कँपसाठी बोलावल आहे. (For NCA ie National Cricket Academy in Bangalore)
शिकण्याचं स्वप्न अधुरीच राहील..! लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थीनीची चाकूने हत्या
माहितीनुसार, अर्जुनसोबत या कॅम्पमध्ये मोहित रेडकर, अभिषेक शर्मा, मानव सुतार, हर्षित राणा, चेतन साकरिया, दिविज मेहरा आणि इतर काही खेळाडूंचा समावेश आहे. अर्जुनला बीसीसीआयने बोलावणं पाठवल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातारण पाहायला मिळत आहे.
लग्नानंतर जोडपे हनिमूनला गेले मात्र त्यांच्यासोबत घडलं भयानक; वाचून अंगावर काटा येईल…
हे ही पाहा