अरमान मलिक (Arman Malik) हा एक प्रसिद्ध युट्युबर (Youtuber) आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या दोन्ही पत्नी कृतिका मलिक व पायल मलिक एकाचवेळी गरोदर असल्याचे वृत्त आले होते. यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला होता. अशातच अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींचा भांडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
उच्चशिक्षित तरुणाचा भन्नाट प्रयोग! शेणापासून केला रंग निर्मितीचा उद्योग सुरू
या व्हिडिओमध्ये अरमान मलिक त्याची पत्नी पायलला चॉकलेटचा बॉक्स आणि कृतिकाला नवीन आयफोन 14 भेट देत व्हॅलेंटाईन डे ( Valantaine Day) साजरा करताना पहायला आहे. खरंतर पायलला मिठाई आवडत नाही, परंतु, अरमानच्या आनंदासाठी ती हसतमुखाने ते गिफ्ट स्वीकारते.
सलमान खानने अभिनेत्री भाग्यश्रीला दिली होती मोठी कबुली, म्हणाला होता, “मी लवकरच मुलींना कंटाळतो…”
मात्र, नंतर जेव्हा पायलच्या लक्षात येते की कृतिकाला अरमानकडून नवीन आयफोन मिळाला आहे, तेव्हा ती अरमानशी भांडू लागली. यावेळी पायल रागाने अरमानला विचारते की तो फोन तिला भेट म्हणून का दिला नाही? तर दुसरीकडे, कृतिका नवीन फोनविषयी खूप आनंदी असल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका; म्हणाले, “आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात…”
यानंतर पायल आणि कृतिकामध्ये फोनवरून मोठा वाद झाला आहे. दरम्यान चिडून पायल अरमानला सांगते की हे गिफ्ट तू परत कर. हे ऐकून कृतिकाला राग येतो. यावेळी पायल बोलते की इसको आयफोन और मुझें चॉकलेट? हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
एमसीस्टॅन होता वाईट संगतीत! मात्र आईवडिलांनी घेतला ‘हा’ निर्णय आणि बदलले आयुष्य