Agricultural News । अहमदनगर : राज्याच्या अनेक भागात मुबलक प्रमाणात पाऊस (Rain) झाला नाही. अनेक भागात तर पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. अशातच काही शेतकरी जेमतेम पावसाच्या पाण्यावर पेरणी (Sowing) करू लागले आहेत. परंतु आता त्यांच्यासमोर बियाण्यांचे मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांची बियाणे (Seed) खरेदी करताना फसवणूक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे. (Latest Marathi News)
Smartphone Tips । तुमचाही फोन सतत हँग होतोय का? तर ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो
नगर तालुक्यातील कामरगाव येथील शेतकऱ्यांची कोबी पिकाचे बियाणे (Cabbage seed) घेताना फसवणूक झाली आहे. त्यांनी खरेदी केलेले बोगस (Cabbage seed fraud) निघाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता संबंधित कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. (Seed fraud)
Onion Price । शेतकऱ्यांना मोठा धक्का! कांद्याचे दर रोखण्यासाठी सरकारने घेतला निर्णय
याबाबत अधिक माहिती अशी की, कामरगावमधील शेतकरी वसंतराव ठोकळ यांनी त्यांच्या शेतात कोबीची लागवड केली होती. त्यांनी त्यासाठी हजारो रुपये खर्च करून आवश्यक खते आणि औषधांची फवारणी केली होती. परंतु तीन महिन्यांमध्ये पोषित फळधारणा झाली नाही, शिवाय आलेली फळे देखील कुपोषित आली. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
Rain Update । राज्यात पावसाचं कमबॅक केव्हा होणार? हवामान खात्याने दिले महत्त्वाचे संकेत
त्यानंतर ठोकळ यांच्या शेतातील पिकाची पाहणी केली. पाहणीदरम्यान कृषी विभागाला अपेक्षित फळधारणा झाली नसल्याचे आणि फळे कुपोषित असल्याचे निदर्शनास आले. जर संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही तर ठोकळ यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
Politics News । शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र, ‘या’ विषयावर झाली चर्चा