Site icon e लोकहित | Marathi News

अर्रर्र.. टोमॅटोने पार केली शंभरी, पण शेतकऱ्यांना मिळतोय फक्त ‘इतकाच’ भाव

Tomato

मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या किमतीत (Tomato Price) वाढ झाली आहे. टोमॅटोने शंभरी पार केली आहे. त्यामुळे टोमॅटो (Tomato Rate) उत्पादक शेतकऱ्यांना महागाईच्या काळात ‘अच्छे दिन’ आले आहेत. इतकेच नाही तर यावर्षी पाकिस्तानमध्ये (Pakistan) निर्यात वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप होत आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे दक्षिणेकडील राज्यातून टोमॅटोची आयात केली जात आहे.

Ashadhi Ekadashi । विठुरायाच्या गजरात पार पडली शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा, यंदाचे ‘हे’ ठरले मानाचे वारकरी

महाराष्ट्र राज्यात आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), तामिळनाडू आणि तेलंगणातून (Telangana) टोमॅटोची आयात करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक भाज्या, पिके खराब झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहे. याचा फायदा जरी शेतकऱ्यांना होत असला तरी सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पाहा Photo

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जरी टोमॅटोने शंभरी (Tomato Rate in Maharashtra) पार केली असली तरी शेतकऱ्याला प्रतिकिलो केवळ 40 ते 50 रुपये इतका दर मिळत आहे. याचा सर्वात जास्त फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. हीच परिस्थिती इतर भाज्यांची आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर कमी असून किरोकळ बाजारात हेच दर गगनाला भिडले आहेत. येत्या काळात हेच दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बहुजनांच्या पोरांना भडकावणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झालीच पाहिजे; छगन भुजबळ यांची मागणी

Spread the love
Exit mobile version