सातारा जिल्हा हे एक निसर्गरम्य ठिकाण ओळखले जाते. ऐतिहासिक राजधानी म्हणून असलेली ओळख व नैसर्गिक सौंदर्य यामुळे सातारा (Satara) पर्यटकांसाठी आवडते पर्यटन स्थळ बनले आहे. हिवाळ्यात साताऱ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते. महाबळेश्वर, कास पठार, पाचगणी यांसारख्या ठिकाणी फिरण्यासाठी मोठ्या संख्येने लोक या काळात येतात. दरम्यान साताऱ्यातील वासोटा किल्ला ( Vasota fort) देखील या काळात गिर्यारोहकांनी गजबजून गेलेला असतो. परंतु, वासोटा किल्ल्यावर ३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
अक्षय कुमारने महिलांना दिले स्वसंरक्षणाचे धडे; कार्यक्रम सुरू असताना अचानक महिला ओरडू लागली!
पर्यटक आणि गर्दीतील हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांचा जंगली प्राण्यांना त्रास होऊ नये, यासाठी वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी सुद्धा या तीन दिवशी किल्ला बंद ठेवण्यात आला होता. नवीन वर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी या दिवसांत पर्यटक वासोट्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
वयाच्या साठीमध्ये प्रेयसीबरोबर दूर जाऊन राहण्यासाठी केले हे ‘कृत्य’, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
यातील उत्साही पर्यटकांकडून किल्ल्यावर होणारा उपद्रव लक्षात घेऊन प्रत्येक वर्षी हे तीन दिवस किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घातली जाते. निसर्ग व वन्य जीवांना कोणताही धोका पोहचू नये म्हणून वन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोयना जलाशयातून वासोट्याकडे पर्यटक वाहतूक करणाऱ्या बामणोली, तापोळा विभागातील बोट चालकांना वनविभागाने सूचना दिल्या आहेत . तसेच पुढील तीन दिवसांत किल्ल्यावर प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा; खुर्चीखाली बॉम्ब फुटेल! अशा शब्दात सुनावले