Site icon e लोकहित | Marathi News

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडीओप्रकरणी कलावंत मंगला बनसोडे यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, “हे पाहून फार वाईट…”

मागील दोन दिवसांपासून गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. गौतमी पाटील चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलत असतानाचा तो व्हिडीओ असून या आक्षेपार्ह व्हिडीओ मुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली असून गुन्हेगार अद्याप पकडण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर काही कलाकारांनी आक्रमक भूमिका देखील घेतली आहे. दरम्यान या प्रकरणावर लोककलाकार मंगला बनसोडे-करवडीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्री वेडिंग शूट करायला गेले अन् फोटोग्राफरसोबत घडलं भलतंच; व्हिडीओ एकदा बघाच

त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रात एका स्त्रीची विटंबना होते, हे खूप चुकीचं आहे. गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाला हे एकूण मला खूप वाईट वाटले. कपडे काढतानाचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करणं अत्यंत चुकीचं आहे. तिने याआधी चुका केल्या असल्या तरी तिने त्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र आता सारखी सारखी ज्या पद्धतीने स्त्री जातीची विटंबना होत आहे, हे पाहून खु वाईट वाटतं,” असं मंगला बनसोडे-करवडीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

कसब्यात भाजपा-शिंदे गटाचा पराभव होताच एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एका विजयाने…”

त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या, महिला कलावंतांचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करणं ही बाब अत्यंत निंदनीय आहे. महाराष्ट्रामध्ये महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते? असा प्रश्न देखील यावेळी मंगला बनसोडे-करवडीकर यांनी केला आहे.

ब्रेकिंग! संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

Spread the love
Exit mobile version