मागील दोन दिवसांपासून गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. गौतमी पाटील चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलत असतानाचा तो व्हिडीओ असून या आक्षेपार्ह व्हिडीओ मुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली असून गुन्हेगार अद्याप पकडण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर काही कलाकारांनी आक्रमक भूमिका घेतली असून ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ
गौतमी पाटीलच्या ( Gautami Patil) पहिल्या वहिल्या ‘घुंगरू’ या चित्रपटाची टीम तिच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला आहे. गौतमी पाटीलचा अशाप्रकारचा व्हिडीओ व्हायरल करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. असे मत ‘घुंगरू’ ( Ghungaru) चे निर्माते व कलाकारांनी व्यक्त केले आहे.
‘त्या’ एका अहवालाने सगळा गेम बदलला; अदानी ठरले टॉप लुझर आणि एलन मस्क ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत
यावेळी ते म्हणाले आहेत की, “आम्ही रोज गौतमी पाटीलला सावरतो आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे ती फारच हताश झाली असून पोलिसांनी लवकरात लवकर व्हिडिओ काढणाऱ्यांसह शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.” यासाठी चित्रपटाच्या टीम कडून पोलिसांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा ते रस्त्यावर उतरणार आहेत.
आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घडला हा किस्सा