स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ पुन्हा एकदा चर्चेत विषय ठरत आहे. मालिकेची कथा पुन्हा एकदा अरुंधती आणि आशुतोष यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. अरुंधतीच्या आयुष्यात सध्या बऱ्याच घडामोडी घडत असुन तिच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
धनुष्यबाण व शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!
अरुंधती आणि आशुतोष लग्न करणार आहेत. पण त्यांच्या लग्नाला कांचन आणि अनिरुद्ध देशमुख यांनी कडाडून विरोध केला आहे. परंतु अरुंधतीच्या लग्नाला आप्पांनी पुरेपूर सपोर्ट केला आहे. त्यामुळे मालिका एक नवीन वळण घेताना दिसत आहे.
ब्रेकिंग! राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अंधेरी कोर्टात केलं हजर
अरुंधतीच्या लग्नावर आप्पांनी निर्णय घेतला की, ज्यांना हे लग्न मान्य नाही, त्यांनी या घरातून निघून जावे, असा थेट आदेश आप्पांनी देशमुख कुटुंबीयांना दिला आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. दरम्यान, हे लग्न मोडण्यासाठी अनिरुद्ध पुरेपूर प्रयत्न करत आहे.
देवेंद्र फडणवीसांनी घेतली सूत्रे हातात; कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी
दुसरीकडे आशुतोष अरुंधतीला अशा काही गोष्टी सांगणार आहे. ज्यामुळे त्या दोघांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण नक्की तो काय सांगणारं याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बिग ब्रेकिंग! आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली नाही; पोलिसांचा दावा