Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे आम आदमी पक्षाचे (आप) नेते घाबरले आहेत. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडियावर भीती व्यक्त केली आहे की अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशीच्या बहाण्याने केजरीवाल यांना अटक करू शकते. केजरीवाल यांना निवडणूक प्रचारापासून रोखण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. दुसरीकडे, ईडी केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक करू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
Iran Explosion News । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! इराण स्फोटाने हादरलं, 105 जणांचा मृत्यू
दिल्लीत गुरुवारपासून ‘आप’चे जनसंवाद अभियान सुरू होत आहे. केजरीवाल जनसंवाद अभियानातून नागरिकांच्या घरोघरी पोहचणार आहेत. दिल्लीचे सर्व मंत्री, आमदार आणि नगरसेवक प्रचारात सहभागी होणार आहेत. मात्र प्रचार सुरू होण्यापूर्वी केजरीवाल यांना अटक होण्याची भीती आप नेत्यांना वाटत आहे.
दिल्ली दारू घोटाळ्यात ईडी केजरीवाल यांना समन्स पाठवत आहे, पण ते तपास यंत्रणेसमोर जात नाहीत. ईडीने केजरीवाल यांना तीन वेळा चौकशीसाठी बोलावले आहे, मात्र दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या नोटीसकडे तीन वेळा दुर्लक्ष केले आहे. केजरीवाल बुधवारी ईडीसमोर हजर होणार होते, मात्र त्यांनी केवळ उत्तर पाठवले. नोटीस बेकायदेशीर असल्याचे सांगून निवडणुकीपूर्वीच नोटीस का आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी 2 नोव्हेंबर आणि 21 डिसेंबरलाही ईडीने केजरीवाल यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते.