Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना कथित दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी (Liquor Policy Scam Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) आज सकाळी 11 वाजता समन्स बजावले आहे. केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
ईडीने समन्स जारी केल्यांनतर आपच्याअनेक नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच आपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, “केंद्र सरकारचे एकच उद्दिष्ट आहे. कोणत्याही किंमतीत आम आदमी पार्टीला संपवणे. यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवून आम आदमी पक्षाचा नाश करण्याचा विचार असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.
Hasan Mushrif । सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची केली तोडफोड
दिल्लीचे मंत्री आतिशी यांनीही मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य अटकेबाबत दावा केला असून, चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. एजन्सीकडे आपल्या विरोधात पुरावे आहेत म्हणून नाही तर ते भाजपच्या विरोधात बोलले म्हणून हे घडेल असा आरोप त्यांनी केला.
Airbags Can Kill You । कारची एअरबॅग घेईल तुमचा जीव! चुकूनही ‘या’ चुका करू नका