Aryan Arora । बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केलेल्या आर्यन अरोराला पार्किंगच्या वादातून क्रिकेट अकादमीच्या (Cricket Academy) केअरटेकरने ( care taker) बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
आर्यनचे वडील आणि समाजवादी पक्षाचे नेते मधुकर अरोरा यांनी शनिवारी सांगितले की, 18 वर्षीय आर्यन अरोरा शुक्रवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत येथील क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता, त्यावेळी कार पार्क करण्यावरून झालेल्या वादानंतर अकादमीच्या केअरटेकरने त्याला मारहाण केली. श्री कृष्ण याने त्याच्या (आर्यनच्या) डोक्यावर कथित वार केले, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
Viral Video । लंडनमध्ये जोरदार वाऱ्यामुळे विमानाचा तोल बिघडला, लँडिंग पाहून लोक हादरले
घटनेनंतर मित्रांनी आर्यनला रुग्णालयात दाखल केले
या घटनेनंतर मित्रांनी आर्यनला खासगी रुग्णालयात दाखल केले. आर्यनच्या डोक्यात 10 टाके पडले असून त्याची प्रकृती आता सुधारत असल्याचे रुग्णालयाचे डॉ.संजय गुप्ता यांनी सांगितले. आर्यनने ‘जबरिया जोडी’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली आणि इतर काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आर्यनने सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांसारख्या बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले आहे.