मुंबई : राज्यात कोरोनानंतर मोठय़ा जल्लोषात दहीहांडी साजरी झाली. मुंबई, नावी मुबईतून अनेक गोविंदा ठण्यात (Thane) दाखल झाले. जनमाष्ठमी निमित्त अनेक कार्यक्रम साजरी करण्यात आले. थरावर थर रचून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला.ठाणे महानगपालिकेच्या वतीने ठाणे शहरातील मुख्य आठ दहीहंडीच्या ठिकाणांपैकी चार ठिकाणी चार वैद्यकीय पथके कार्यरत ठेवली होती व उर्वरीत चार ठिकाणी एक वैद्यकीय पथक फिरते ठेवले होते.
दहीहांडी उत्सवात हंडी फोडतांना तब्बल ६४ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.यातील ५२ वर्षीय गोविंदावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर अन्य ११ रुग्णांवर कळवा व जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील नौपाडा येथे राहणारे संतोष शिंदे (५२) हे प्रभात सिनेमा येथे हंडीचे थर लावतांना पडले होते. ते बेशुध्द झाल्याने त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सुरज पारकर (३८) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय नितीन चव्हाण (१६), शैलेश पाठक (३२), शितलू तिवारी (२५), साहिल जोगळे (१५), आनंद रानु (०५), सनी गुरव (१२), बालाजी पाटील (३०), जाहीद शेख (२०) यांच्यावर कळवा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण 64 गोविंदापैकी १२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ५२ जणांवर प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.