मुंबई : यावर्षी एमपीएससी (MPSC) आणि सीईटी (CET) या परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थींसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. असे भरपूर विद्यार्थी असतात जे एमपीएससी आणि सीईटी या दोन्ही परीक्षेची तयारी करत असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर नेमकी कोणती परीक्षा द्यायची हा प्रश्न उपस्थित झाला होता. आता यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक मोठा निर्णय घेतला असून दोन्ही परीक्षांच्या तारखा बदलण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
दि.२१/८/२२ रोजी सीईटी कक्षा मार्फत B.Ed व BHMCT या दोन विषयाची परीक्षा होणार असून ज्या उमेदवारांनी या विषयात सोबत MPSC परीक्षेस बसलेले असतील त्यांनी त्वरित सीईटी कक्षात email द्वारे अवगत करावे. सीईटी मार्फत त्यांना परीक्षेसाठी बॅच बदलून देण्यात येईल.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 17, 2022
maharashtra.cetcell@gmail.com pic.twitter.com/6lpuCovrVV
विद्यार्थ्यांनी काय करायचं?
एमपीएससी आणि सीईटी या दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून CET च्या सेलला संपर्क करण्यास सांगण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि सीईटी या दोन्ही परीक्षांचे पेपर द्यायचे आहेत, त्यांना CET परीक्षेसाठी तारीख बदलून घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.