
सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून (Kasba and Chinchwad elections) राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवारी कोणाला देणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजून ठरलं आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला झालाय. दरम्यान उमेदवारीबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारल असता त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मला राजकारणात यायचं नव्हतं पण…”, राज ठाकरे यांनी केला मोठा खुलासा
चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी देणार असा प्रश्न विचारताच अजित पवार भडकले आणि म्हणाले “मला मूर्ख समजू नका, मी उद्या उमेदवाराचे नाव सांगणार आहे.” त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राखी सावंतने केला धक्कदायक खुलासा; म्हणाली, “आदिलने मला लाथेने मारलं…”
दरम्यान, नगरसेवक रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे आणि बाळासाहेब दाभेकर यांच्या नावाची महाविकास आघाडीकडून चर्चा आहे. यामध्ये रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
अजित पवारांनी सांगितले डोक्यावरील केस जाण्याचे कारण; म्हणाले, “रामदेव बाबांनी सांगितले म्हणून…”