काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निकालादिवशीच बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिला आहे. आता यांनतर थोरातांचं पुढचं पाऊल काय? याबाबत अनेक चर्चा चालू आहेत.
अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर सणसणीत टीका; म्हणाले, “हे निर्णयशून्य सरकार….”
यामध्येच आता भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. राम शिंदे म्हणाले, सगळीकडे भाजपचे सरकार आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार आहे. भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्यावर अन्याय होत असेल तर त्यांना भाजप आसरा देण्यासाठी तयार आहे. असं रामशिंदे म्हणाले आहेत. ते शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राहुल कलाटे यांना बंडखोरी पडणार महागात! शिवसेनेतून हाकलपट्टी होण्याचे संकेत
असं म्हणत भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांना खुली ऑफर दिली आहे. राम शिंदे यांच्या या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आपले आहे.
उद्धव ठाकरेंनी सांगून देखील राहुल कलाटे मागे हटत नाहीत; चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत