काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निकालादिवशीच बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान आता यावर इंदुरीकर महाराजांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त आयोजित किर्तन सोहळ्यामध्ये इंदुरीकर महाराज यांनी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ” घाव सहन करणारे दगडचं मूर्तीसाठी वापरले जातात. कोणतेही दगड मूर्तीसाठी वापरले जात नाहीत, ज्यांच्यामध्ये घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित मिळते” असं इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मतपेरणी; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, “जे दगडं घाव सहन करतात तीच मूर्तीसाठी उपयोगी पडतात, हे वाक्य बाळासाहेब थोरातांना लागू होतय. असं इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत.
मोठी बातमी! आदिल खान दुर्रानीला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात, राखीने दाखल केली तक्रार