
लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) मागील काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत आहे. अगामी ‘घुंगरू’ चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला गौतमीने मुलाखत दिली यावेळी तिने आगामी चित्रपटाची माहिती दिली. तसेच तिचे नवीन लावणी नृत्य देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती दिली. आता गौतमीच पुन्हा एक नवीन गाणं रिलीज झालं आहे.
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा खर्च; वाचून डोळे फिरतील
मागच्या काही दिवसांपूर्वी गौतमीने गाणं येणार असल्याची माहिती एका पोस्टरच्या माध्यमातून दिली होती. “मी तुम्हाला करते मुजरा” हे गौतमीच गाणं रिलीज झालं आहे. आता ते गाणं रिलीज झालं असून त्याला नेहमीप्रमाणे चाहत्यांचा आणि नेटकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
“मी तुम्हाला करते मुजरा” गौतमीच्या या गाण्याला खूप प्रतिसाद दिला आहे. नेटकरी यावर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत आहेत. काही किवसापूर्वी लोकांनी गौतमीच्या कार्यक्रमावर बंदी यावी अशी मागणी केली होती. दरम्यान आता नेटकऱ्यांनी गौतमीला आपल्या शहरात, गावामध्ये जाहीर कार्यक्रमांचे निमंत्रण देखील दिले आहे.