गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तरुणांपासून महताऱ्यांपर्यंत अनेक गौतमीचे चाहते आहेत. गौतमीचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात धिंगाणा करतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांचा गोंधळ हे समीकरण काही आपल्यासाठी नवीन नाही. गौतमीच्या कार्यक्रमात सतत गोंधळ होतच असतो. त्यामुळे गौतमी सतत चर्चेत असते.
महिंद्रा थार खरेदी करणाऱ्यांसाठी समोर आली वाईट बातमी!
राजकीय कार्यक्रम, शॉपचे उद्घाटन, किंवा बर्थ डे असो अशा अनेक कार्यक्रमांना गौतमी पाटील उपस्थित राहते. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
खडकवासलाचे पाणी येत नसल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल
गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होतो म्हणून पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी देखील गोंधळ होतो. मात्र जुन्नर तालुक्यातील काही महिलांनी गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून हातात काठ्या व दांडकी घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता किंवा गोंधळ गडबड न होता जुन्नर तालुक्यात गौतमीचा कार्यक्रम अगदी शांततेत पार पडला.
भाजपविरोधात लढण्यासाठी महाआघाडीच्या हालचाली सुरु, शरद पवारांनी घेतली खर्गे आणि राहुल गांधींची भेट