कुस्ती ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. पुण्यात (Pune) १० जानेवारीपासून पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहेत. मोठ्या व मानाच्या कुस्ती स्पर्धांपैक एक स्पर्धा म्हणून ‘महाराष्ट्र केसरी’ ची ओळख आहे. दरम्यान काल पुण्यात ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा शिवराज राक्षे याने पटकावली आहे.
“आम्हीही राजकारणामध्ये कुस्ती करतो, पण…” देवेंद्र फडणवीसांच वक्तव्य चर्चेत
यांनतर आता शिवराजसाठी आणखी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. शिवराजला शासकीय नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदेनी याबाबत एक ट्विट केले आहे.
मॅटवर रंगलेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चितपट करणाऱ्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच राज्य सरकारकडून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला सरकारी नोकरीत नक्की प्राधान्य देण्यात येईल असेही जाहीर करतो.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 14, 2023
मोठी बातमी! शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी
ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी लिहिले की, “मॅटवर रंगलेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चितपट करणाऱ्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच राज्य सरकारकडून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला सरकारी नोकरीत नक्की प्राधान्य देण्यात येईल असेही जाहीर करतो”.