Anantnag encounter । अनंतनाग : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सतत भारतीय लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये चकमक होते. अनेकदा या चकमकीत काही दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा होतो तर काही जवानांना वीरमरण येते. मागील चार दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग जंगलात (Kokarnag forests) सुरक्षा दलाची अतिरेक्यांसोबत चकमक सुरू आहे. (Latest Marathi News)
Asia Cup 2023 । पावसामुळे फायनल होऊ शकली नाही तर ‘या’ संघाला मिळणार ट्रॉफी
सलग चौथ्या दिवशी अतिरेक्यांवर सुरक्षा दलाने (Security forces) ड्रोन आणि रॉकेट लॉन्चरद्वारेही बॉम्ब वर्षाव सुरू केला. त्यामुळे अतिरेक्यांनी जीवमुठीत घेऊन पळ काढायला सुरुवात केली. अतिरेक्यांच्या तळांवरच जबरदस्त हल्ला चढवून ते उद्ध्वस्त केले आहे. जोपर्यंत अतिरेक्यांचा खात्मा होत नाही, तोपर्यंत हे ऑपरेशन सुरूच राहणार आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.
Politics News । बिग ब्रेकिंग! १६ आमदार अपात्रतेसंदर्भात महत्त्वाची माहिती आली समोर
दरम्यान अजून तीन ते चार अतिरेकी या जंगलात लपून बसले आहेत. सुरक्षा दलाने आतापर्यंत तीन ते चार अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. 2020 नंतरचा हा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला असून यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये 30 मार्च 2020 मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. आता हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात आले आहे. यात तीन जवान शहीद झाले आहेत.