Site icon e लोकहित | Marathi News

अर्थसंकल्प जाहिर होताच अंबादास दानवेंनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, “महागाई अन् बेरोजगारीचं काय?”

As soon as the budget was announced, Ambadas Danve raised the question; Said, "What about inflation and unemployment?"

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर (Budget 2023) केला आहे. यामध्ये त्यांनी विविध महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या असून नवीन कर संरचना देखील जाहीर केली आहे. तसेच यंदाच्या संकल्पात सात उद्दिष्टांना महत्त्व देण्यात आले आहे. ज्यांना सप्तर्षी असे संबोधले जात आहे. दरम्यान अर्थसंकप्ल जाहीर होताच अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाडांना अटक होणार? ‘त्या’ एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन कोटी लोकांना रोजगार देणार असल्याचे म्हणाले होते त्याचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर महागाई प्रचंड वाढली आहे, पेट्रोल-डीझेलचे दर गगनाला भिडले आहेत. जनतेला ज्या गोष्टींशी देणघेणं नाही अशा गोष्टीचे दर कमी करण्यात आले आहे. असा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.

महाराष्ट्रात प्रथमच महिला एसटी चालवणार! प्रशिक्षण आले अंतिम टप्प्यात

दरम्यान, या गोष्टींच्या किमती होणार कमी जास्त

या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी कोणत्या गोष्टी महागणार व कोणत्या गोष्टी स्वस्त होणार याची देखील माहिती दिली आहे. यामध्ये मोबाईल फोन, हिऱ्यांचे दागिने, टीव्ही पॅनल, इलेक्ट्रॉनिक वाहने, सायकल या वस्तू स्वस्त होणार आहेत. तर सिगारेट, इमिटेशन ज्वेलरी, सोने, चांदी, प्लॅटिनम, इंपोर्टेड इलेक्ट्रिक वाहन या गोष्टी या वर्षात महागणार आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार होते त्यांनी तर उत्पादन खर्चच दुप्पट केलाय; अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

1) अगामी काळात कृषी क्षेत्रासाठी डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अॅग्रीकल्चर अॅक्सिलरेटर फंड उभारण्यात येणार आहे. यामुळे शेती स्टार्टअपना प्रोत्साहन मिळणार आहे.
2) भरड धान्याचे उत्पादन, त्याची विक्री आणि संशोधन यासाठी सरकार पुढाकार घेणार.
3) देशात नवीन 157 नर्सिंग कॉलेज स्थापन होणार.
4) लहान व किशोरवयीन मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन होणार.
5) जेष्ठ नागरिकांना बचत योजनेवर सुविधा मिळणार
6) पंतप्रधान आवास योजनेचा निधी 66 टक्क्यांनी वाढला.
7) पायाभूत सुविधांसाठी निधीमध्ये 33 टक्क्यांनी वाढ
8) देशात 50 नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहेत.

राखी सावंतचे लग्न धोक्यात; स्वतःच केला खुलासा, म्हणाली…

Spread the love
Exit mobile version