Sujay Vikhe Patil: “…म्हणून सुजय विखे पाटील राजकाणात”

"…as Sujay Vikhe Patil in Rajkanat"

केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) व खासदार संजय राऊत ( Sanajay Raut) यांच्यातील वाद अगदी शिगेला पोहोचले आहेत. हे दोन्ही नेते मर्यादा सोडुन एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe-Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांनी जपून बोलायला हवं. असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Pune: पुणे येथील काही खासगी आयटी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची फसवणूक

“राज्यातील राजकारणाची ( Maharashtra Politics) पातळी सध्या घसरल चाललेली आहे. यावर प्रत्येक पक्षांनी कुठेतरी निर्बंध घातला पाहिजे. संजय राऊत व नारायण राणे हे दोघेही नेते खूप मोठे आहेत. त्यांच्यावर मी भाष्य करणं उचित नाही. मात्र, प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांनी जपून बोललं पाहिजे” असे सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.

धक्कादायक! थंडीमुळे १४ जणांचा मृत्यू

या दरम्यान त्यांनी आपली राजकारणात येण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. डॉक्टर या नात्यानं आपण चांगला व्यवसाय चांगला करत होतो. परंतु, जनतेच्या प्रेमामुळं राजकारणात यावे लागले. मी राजकारणात नसताना देखील समाजाला चांगली दिशा देण्याचे काम करू शकतो. परंतु, जनतेने दिलेली जबाबदारी देखील पार पाडावी लागते. असे ते यावेळी म्हणाले आहेत.

उर्फी जावेदच्या संपत्तीबद्दल वाचून तुम्हाला ही बसेल धक्का; ‘ही’ गोष्ट करून कमावले कोट्यवधी रुपये!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *