पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्यानं संतापलेल्या पत्नीने थेट आंदोलन केले आहे. ही धक्कादायक घटना सांगलीमधून समोर आली आहे. एका महिलेच्या पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊन देखील तो अर्ज नाकारला गेला यामुळे सांगलीच्या आटपाडी येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगारप्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
एका महिलेन केलेल हे अनोख आंदोलन आता सगळीकडे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. विलास कदम असं या कर्मचाऱ्याचं आहे. ते अनेक वर्षापासून राज्य परिवहन मंडळामध्ये चालक पदावर कार्यरत आहेत. मात्र ते ७० दिवसांनी रिटायर होणार आहेत. आणि त्याच्या २७० सुट्ट्या शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी दोन दिवसांच्या सुट्टीसाठी अर्ज केला होता.
नाटू नाटू गाण्याला ऑस्कर अवॉर्ड मिळताच अमोल कोल्हेंचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
मात्र अर्ज करून देखील अगारप्रमुखांनी त्यांना सुट्टी देण्यास नकार दिला. म्हणून संतापलेल्या पत्नीने आंदोलनास सुरवात केली आहे. आता हा विषय सगळीकडे चर्चेत आहे. त्याचबरोबर आता या प्रकरणात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
“मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नाही”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य