घरगुती वापरात कांद्याला विशेष महत्व आहे. मात्र हाच कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन पाणी काढत आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर (Onion rates) घसरताना दिसत आहेत. कांद्याची देशांतर्गत मागणी सध्या कमी आहे. त्यात निर्यातीला सुद्धा ग्रहण लागले आहे. यामुळे कांद्याचे दर घसरले असून शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पडून आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतातुर झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर नगर येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांदा फुकट वाटून दिला आहे.
“…तर इलॉन मस्क पेक्षा मी जास्त श्रीमंत असतो”, योगगुरू रामदेव बाबा यांचे विधान चर्चेत
कांद्याचे दर रोजच घसरत आहेत. यामुळे कांदा रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात गेलेला बरा म्हणून नगरमधील ( Nagar) एका शेतकऱ्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. संगमनेर मधील पिंपरनेर येथील युवा शेतकरी धंनजय थोरात यांनी त्यांचा काढणीला आलेला चार एकर कांदा फुकट वाटला आहे. यामुळे एकीकडे या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या दिलदारपणाचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे या शेतकऱ्याच्या हतबलतेने लोकांना अस्वस्थ केले आहे.
खरंतर धंनजय थोरात यांनी फार आशेने चार एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. यासाठी त्यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत दोन लाख रुपयांचा खर्च केला. योग्य व्यवस्थापन, मेहनत व खतांचा पुरवठा यामुळे थोरात यांचे कांद्याचे पीक जोमात आले होते. यातून चांगला आर्थिक फायदा होईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने कांद्याचे दर ढासळले. यातून फायदा तर सोडाच मात्र उत्पादन खर्च देखील मिळण्याची शाश्वती राहिली नाही. यामुळे थोरात यांनी कांदा फुकट वाटून टाकला.
नाशिकच्या पान हाऊसमध्ये मिळते चक्क दीड लाखांचे पान! खवय्यांची होते गर्दी