कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, कांदा पिकावर फिरवला ट्रॅक्टर; पाहा VIDEO

आपल्या आहारात कांद्याला विशेष महत्त्व आहे. इतकंच नाही तर बहुतेक भाज्या बनवण्यासाठी कांदा लागतोच. हाच कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन पाणी काढत आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर (Onion rates) घसरताना दिसत आहेत. कांद्याची देशांतर्गत मागणी सध्या कमी आहे. त्यात निर्यातीला सुद्धा ग्रहण लागले आहे. यामुळे कांद्याचे दर घसरले असून शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पडून आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतातुर झालेले आहेत.

उच्चशिक्षित तरुणाचा भन्नाट प्रयोग! शेणापासून केला रंग निर्मितीचा उद्योग सुरू

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शेतकरी आपल्या कांद्यामध्ये ट्रॅकटर फिरवत रोटर मारत आहे.

माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या कंदा पिकांमध्ये रोटर फिरवला आहे. कांद्याचे पीक काढून मार्केटमध्ये नेणे परवडत नसल्याने शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केलाय. त्याचबरोबर कांद्याला भाव कधी येणार असा प्रश्न देखील सरकारकडे उपस्थित केला आहे.

अरमान मलिकच्या पत्नींमध्ये पुन्हा एकदा वाद! व्हिडीओ होतोय व्हायरल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *