औरंगाबादच्या (Aurangabad) गंगापूर (Gangapur) तालुक्यातील बगडी येथे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गोदावरी नदीकाठी शेतजमीन असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जात येत नाही. त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक झाले असून जनआंदोलन करण्यात आले आहे. रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.
Milk Price: ‘या’ डेअरीने दुधाच्या दरात केली वाढ; वाचा सविस्तर
अनेकवेळा मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्याने हे जलआंदोलन केले आहे. यावेळी शेतकरी पाण्यात उतरल्याचे दिसत आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांची जमीन नदीकाठी आहे त्यामुळे नदीतील पाणी सतत आसपासच्या परिसरात व रस्त्यावर पसरते. त्यामुळे शेतात जाण्याकरिता असलेला रस्ता वाहून जातो. यामुळे शेतकऱ्यांना शेतात कसे जायचे हा मोठा प्रश्न निर्माण होतो.
एकतर्फी प्रेमातून तरुणाने उचलले मोठे पाऊल; स्वतःला पेटवून घेत तरुणीला मारली मिठी
दरम्यान, दरवर्षी तेथील ग्रामस्थ निधी गोळा करून मुरूम टाकतात पण नदीला पाणी आले की, मुरूम देखील वाहून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी तराफ्याच्या साह्याने जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागतो. यामुळे रास्ता मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे.