कधीकाळी लोकांची प्रचंड श्रद्धा असणारे आसाराम बापू ( Aasaram Bapu) सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भारतात कधीकाळी अध्यात्मिक गुरू असणारे आसाराम बापू एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळले असून, आज त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
मोठी बातमी! पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन
सूरतमधील एका तरुणीवर 2013 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूंवर होता. इतकंच नाही तर या तरुणीच्या बहिणीवर सुद्धा आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केला असल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसाराम बापू, त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा नावाच्या चार अनुयायी आरोपी होत्या.
अखेर प्रियांका चोप्राच्या मुलीचा चेहरा दिसला; पाहा VIDEO
या पार्श्वभूमीवर नुकतीच सुनावणी करण्यात आली. यासाठी आसाराम बापूंना कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. दरम्यान सुनावणीनंतर गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापू दोषी असल्याचे जाहीर केले. परंतु, आज( दि.31) त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आधीच एका प्रकरणात आसाराम बापू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
Pakistan mosque blast: ६३ पोलिसांचा मृत्यू, १५० पेक्षा अधिकजण जखमी तर ४७ लोकांची प्रकृती गंभीर