
ASER Report 2024 । ‘असर’च्या सर्वेक्षणात देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडली जाते. यंदा देखील देशासह राज्यातील शैक्षणिक स्थिती असर च्या सर्वेक्षणातून मांडली गेली आहे. बारावीच्या स्तराचे शिक्षण घेणे अपेक्षित असलेल्या साधारण 68% विद्यार्थ्यांना भागाकार करता आलेला नाही. त्यामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.
Thackeray group । ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; बड्या अधिकाऱ्याला अटक
‘असर’च्या सर्वेक्षणातून यंदाच्या वर्षी देखील राज्यातील शैक्षणिक दुर्दशेचे दर्शन घडले आहे. बारावीचे शिक्षण घेणे अपेक्षित असलेल्या विद्यार्थ्यांना भागाकार देखील करता येत नसल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्याचबरोबर इंग्रजीतील सोपी वाक्य 39 टक्के विद्यार्थ्यांना वाचता आले नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरीच्या स्तराचा मराठीतील परिच्छेद जवळपास 21 टक्के विद्यार्थ्यांना वाचता आला नाही.
सर्वेक्षणानुसार कौशल्य विकास अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचे प्राधान्य नसल्याचे दिसत आहे. एक हजार दोनशे १२०० घरांना भेट देऊन ‘असर’च हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ‘असर’ हे देशव्यापी सर्वेक्षण ‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’तर्फे केलं जातं.
Sushil Kumar Shinde । ब्रेकिंग! काँग्रेसला पुन्हा मोठा झटका बसणार? दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर