
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. एक समाजसेविका व गायिका म्हणून सर्वत्र त्यांची ओळख आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर देखील त्या कायम सक्रिय असतात. दरम्यान अमृता फडणवीस यांची एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांनी नुकतीच सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची भेट घेतली.
ब्रेकिंग! शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय
या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये आशा भोसले व अमृता फडणवीस छान हसताना दिसत आहेत. (Aasha Bhosale & Amruta Fadanvis) तसेच त्या दोघी एकमेकींशी छान संवाद साधताना देखील दिसत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या फोटोंसोबत पोस्ट केलेल्या कॅप्शनची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.
“मला लहान म्हणताय, मग मी मोठा झालो तर… “, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर पलटवार
यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मी नुकतंच आशा भोसले यांना भेटले. त्यांना राज्याचा सर्वोच्च पुरस्कार असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. एचढेच नाही तर आम्ही त्यावेळी संगीताबाबत छान संवादही साधला. यावेळी त्यांनी मला सराव आणि व्हॉईस मॉड्युलेशनबद्दल ( Voice Modulation) मार्गदर्शन केले.