Ashish Jaiswal Accident । सर्वात मोठी बातमी! शिवसेना आमदाराच्या कारचा भीषण अपघात

Ashish Jaiswal Accident

Ashish Jaiswal Accident । भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून माघारी येत असताना ट्रकने मागून जोरात धडक दिली. या अपघातात नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा एका नेत्याच्या अपघाताची बातमी समोर आली आहे.

Maharashtra politics । महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता, खडसेंचे निकटवर्तीय भाजपमध्ये प्रवेश करणार?

रामटेक विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार आशिष जयस्वाल यांचा एक पीए आणि कार्यकर्ते हे रामटेकवरून कन्हानला येत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Rashmi Barve । मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा रश्मी बर्वे यांना सर्वात मोठा धक्का

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये आमदार आशिष जयस्वाल यांच्या पीए समावेत त्यांच्या ताफ्यातील काहीजण जखमी झाले आहेत तर दोन जणांचा मृत्यू देखील झाला आहे. या अपघातामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आशिष जयस्वाल यांच्या भरधाव गाडीचा व समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली आणि हा अपघात झाला.

Sudhir Mungantiwar । सुधीर मुनगंटीवारांच्या अडचणीत होणार वाढ, नेमकं प्रकरण काय?

या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सुदैवाने ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी आमदार आशिष जयस्वाल स्वतः कारमधून प्रवास करत नव्हते.

Nana Patole Car Accident । ‘तो’ अपघात नाही, नाना पटोलेंना चिरडून मारण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा खळबळजनक दावा

Spread the love