मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे महत्वाचे मानले जाणारे नेते अजित पवार (Ajit Pawar) 40 आमदारांसोबत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या आहेत. नंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत या सर्व चालू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता यामध्येच आशिष शेलार यांनी अजित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा अजित पवारांना पाठिंबा; म्हणाले, “अजित दादा जिकडे जाणार तिकडे…”
अजित पवार यांनी दिलीयमध्ये अमित शहा यांची भेट घेतली असल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला. याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या सत्तांतरावर काय चर्चा झाली? ते मी उघड करू शकत नाही, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.
त्याचबरोबर आशिष शेलार यांना अजित पवार भाजपाबरोबर येतील, असं वाटतंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “मला वाटतं की, याबाबत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करायला हवी. त्यामुळे असा प्रश्न भाजपाला विचारणं चुकीचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय सुरू आहे? हे त्यांनाच माहीत आहे. असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
प्राजक्ता माळी आणि सलमान खान अडकणार लग्न बंधनात? प्राजक्ता म्हणाली…