Ashok Chavan । अनेक काळ काँग्रेससोबत घालवलेले नेते म्हणजेच अशोक चव्हाण. यांनी सोमवारी 12 फेब्रुवारीला पक्षाचा राजीनामा दिला आणि नंतर 13 फेब्रुवारीला लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली. पक्ष नेतृत्व संघटना मजबूत करण्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत आपण काँग्रेसवर खुश नसल्याचं अशोक चव्हाण पक्ष सोडल्यावर म्हणाले. मात्र आपल्या ज्योतिषाच्या सांगण्यावरून अशोक चव्हाण यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
Abhishek Ghosalkar Case । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात धक्कादायक CCTV फुटेज समोर
माहितीनुसार, नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांची काही महिन्यांपूर्वी भेट घेऊन अशोक चव्हाण यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय समस्यांवर चर्चा केली. यावेळी महंतांनी त्यांना राजकीय संबंध बदलण्याचा परिवर्तन करण्याचा सल्ला दिला. अशोक चव्हाण यांनी त्या सल्ल्याचे पालन केले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना महंत अनिकेत शास्त्री यांनी स्वतः ही गोष्ट मान्य केली आहे की मी त्यांना पक्ष बदलण्याचा सल्ला दिला होता.
त्याचबरोबर महंत अनिकेत शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार, “अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते 2 ही वेळ निश्चित करण्यात आली होती. याला अभिजीत मुहूर्त असे म्हणतात. या काळामध्ये जो व्यक्ती एखाद्या नवीन गोष्टीला सुरुवात करेल त्याला त्यामध्ये मोठे यश नक्कीच मिळेल.