Ashok Chavan । काल निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतानाच सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. काल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांनी रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.
माहितीनुसार, रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे गेवराई तालुक्याचा दौरा करून आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली आहे. अशोक चव्हाण यांनी यावेळी आपल्या गाड्यांचा ताफा १५ किलोमीटर दूर ठेवला होता. त्यांनी एका स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. यावेळी अशोक चव्हाण आणि जरांगे पाटील या दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. मात्र या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
IPL 2024 । क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! लोकसभेमुळे बदलणार आयपीएलचे वेळापत्रक? समोर आली मोठी माहिती