
Ashok Chavan । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. राज्यात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत पण काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, आता अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Politics News)
याबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम केलं, आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, अशा भावनेतून मी राजीनामा दिला आहे. असं ते म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस पक्षातील कोणत्याही आमदारासोबत माझी काही चर्चा झालेली नाही. राजकीय निर्णय पुढच्या दोन- ते तीन दिवसात घेईल, असं अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून राजीनामा जाहीर केला आहे. सोमवारी सकाळी अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या बैठकीपासून अशोक चव्हाण मीडियापासून दूर आहेत. राहुल नार्वेकर यांनी अशोक चव्हाण यांच्या भेटीला दुजोरा दिला.
Ashok Chavan । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अशोक चव्हाण यांच्यासह ११ आमदार भाजपमध्ये जाणार?