Ashok Chavan । महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आज (मंगळवार, 13 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये 38 वर्षांच्या कारकिर्दीनंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वेळातच व्यासपीठावर बोलताना अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. अशोक चव्हाण यांनी चुकून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना ‘मुंबई काँग्रेस अध्यक्ष’ म्हटले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर हसायला लागले.
Narayan Rane । नारायण राणे यांच्या संदर्भात समोर आली सर्वात मोठी बातमी!
चव्हाण आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ही घटना घडली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत चव्हाण म्हणाले की, “मी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळेच माझ्याकडून चूक झाली. काँग्रेसमध्ये 38 वर्षानंतर भाजपमध्ये प्रवेश करून मी एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे अस ते म्हणाले.”
Mallika Rajput Death । ब्रेकिंग! मनोरंजन विश्वात मोठी खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “पंतप्रधानांनी ‘सबका साथ, सबका विकास’ असे वचन दिले आहे. त्यांना विरोध न केल्याचा आरोप कधी-कधी माझ्यावर झाला आहे. पण मी नेहमीच सकारात्मक राजकारण केले आहे.” असं ते म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis । विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये कसे येतात? फडणवीसांनी सांगितली माहिती