Ashok Chavan । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. खुद्द अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. मी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशोक चव्हाण आज दुपारी मुंबईतील भाजप कार्यालयात पोहोचतील. जिथे भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांना पक्षाचे सदस्यत्व देणार आहेत. भाजपमध्ये प्रवेशाला जाण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Vijay Vadettiwar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! विजय वडेट्टीवारही भाजपसोबत जाणार? बड्या नेत्याचा दावा
नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?
आज मी भाजपमध्ये प्रवेश करत असून नवीन राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. भाजपमध्ये रितसर प्रवेश करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अमरनाथ राजूरकर हे एकटेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमरनाथ राजूरकर हे काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आहेत.
Sharad Pawar । शरद पवार यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!
राऊतांचा गौप्यस्फोट
अशोक चव्हाण हे एकनाथ शिंदे गेले त्यावेळीच काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. ते 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस पक्ष सोडणार होते. अशोक चव्हाण हे गेल्या बऱ्याच काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपड करत होते. त्यांना आता त्यासाठी मुहूर्त मिळाला, असा मोठा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.
Ajit Pawar । अशोक चव्हाणांचा राजीनामा अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “काहीतरी गडबड..”