Ashok Chavan । अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना बावनकुळे यांना किती पैसे दिले? आकडा वाचून व्हाल थक्क

Ashok Chavan

Ashok Chavan । ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी सोमवारी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष सेलार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशाची प्रक्रिया विधिवत पूर्ण करून आपल्या नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी पक्ष प्रवेश अर्ज भरला आणि त्यानंतर प्रवेश शुल्क भरले.

Ganpat Gaikwad Firing । मोठी बातमी! गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड कोर्टात हजर

किती पैसे दिले?

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना बावनकुळे यांना किती पैसे दिले? चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये औपचारिक समावेश केला. अशोक चव्हाण यांचा प्रारंभिक सदस्यत्वाचा फॉर्मही त्यांनी भरला. आता कोणी पहिल्यांदाच पक्षात आले तर त्याला पक्षाचे काही सदस्यत्व शुल्क भरावे लागते. हे शुल्क ५ रुपये आहे. अशोक चव्हाण यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतल्यानंतर 5 रुपये फी भरण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना 20 रुपयांची नोट दिली आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

maratha reservation | मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत खालावली

काय म्हणाले अशोक चव्हाण?

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. यावेळी त्यांनी आपल्यावर आरोप करणाऱ्या नेत्यांवर सडकून टीका केली. चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. मी त्यावर खूप विचार केला. काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिले आहे आणि पक्षासाठी माझेही मोठे योगदान आहे. त्यांनी अचानक माझ्यावर आरोप केले तर ते योग्य नाही, असे ते म्हणाले.

Abhishek Ghosalkar Firing । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती!

Spread the love