
Ashok Chavan । लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी उमेदवारांची घोषणा झालेली नाही. दरम्यान, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा पेच देखील काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाने सांगली जागेवर दावा केला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा आधीपासूनच दावा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे.

Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंड्यावर एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे वक्तव्य!
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागावाटपाचा हा पेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यामुळे निर्माण झाल्याचा धक्कादायक आरोप आता काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेस या दोन्ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत.
महाविकास आघाडीत जागा वाटपाचा जो पेच निर्माण झाला आहे. त्याला अशोक चव्हाण जबाबदार आहेत. असा मोठा दावा काँग्रेसने केला आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. अशोक चव्हाण यांनी जाणून-बुजून हा घोळ केला असा काँग्रेस नेत्यांचा संशय असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले आहे.