
Ashok Chavan । निवडणुकांपूर्वी (Election 2024) राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सर्वात मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
Ashok Chavan । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अशोक चव्हाण यांच्यासह ११ आमदार भाजपमध्ये जाणार?
दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपात (BJP) प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवणार आहे, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” मी माझा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करणार आहे. फक्त दोन दिवस थांबा,” असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
“मी माझी राजकीय भूमिका येत्या दोन दिवसात जाहीर करणार आहे. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिला आहे. मी पक्षासाठी अनेक वर्ष प्रमाणिकपणे काम केलं आता नवीन पर्याय शोधत आहे. पक्षाने माझ्यासाठी खूप केलं असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Pankaja Munde । पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं खळबळ! म्हणाल्या; “राजकारणात वनवास झाला, दगाफटका…”