Site icon e लोकहित | Marathi News

Ashok Saraf | अशोक सराफ यांच्याबाबत मोठी आणि महत्वाची माहिती समोर!

Ashok Saraf

Ashok Saraf | हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांनी चित्रपट तसेच थिएटरमध्ये काम केले आहे. इतकंच नाही तर टीव्ही जगतात अनेक कॉमेडी मालिकांमधूनही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. अशोक सराफ यांना अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, आता अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

Budget Session । मोठी बातमी! अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच मोदी सरकार घेणार सर्वात मोठा निर्णय

अशोक सराफ याना 2023 चा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे.

Rishabh Pant । भीषण अपघातावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया; म्हणाला, “मला वाटले की या जगात माझा वेळ संपला…”

“ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.”

Kerala News । ब्रेकिंग न्यूज! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी १५ जणांना फाशी, कुटुंबासमोरच केली होती हत्या

Spread the love
Exit mobile version