राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. तसेच काँग्रेसचे (congress) अनेक नेते भाजपच्या (bjp) संपर्कात असून भाजपात प्रवेश देखील करणाऱ्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान या चर्चांना काँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पूर्णविराम दिला आहे. थोरात म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडणार, या निव्वळ वावड्या आहेत. यवतमाळ येथून नागपूरला (Nagpur) जात असताना वाटेत बाळासाहेब थोरात शेखर शेंडे यांच्या निवासस्थानी थांबले होते. यावेळी वर्षाताई प्रमोद शेंडे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
Onion: दिवाळीपर्यंत कांदा दरवाढीची शक्यता, महाराष्ट्राच्या कांद्याच्या मागणीला परराज्यातून वाढ
पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात, पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जे घोषणा द्यायच्या कशा याबाबत मूलभूत शिकवण देतात मग ते पक्ष कसा सोडणार, असा प्रश्न उपस्थित केला. तुम्ही किंवा अन्य काँग्रेस नेत्यांबाबत अशी चर्चा का होत नाही, चव्हाणांबाबतच का? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी स्मितहास्य देत अधिक भाष्य टाळले.
Maize Crop: मक्याचे दर टिकून राहतील? पाहुयात नेमकी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
जिल्ह्यातून प्रदेश प्रतिनिधी म्हणून जी नावे गेली, त्यात नेत्यांचे सेवक, गणगोत, कंत्राटदार हे पण असल्याने जाहीरपणे असंतोष व्यक्त होत आहे. पुढे दलित, मुस्लीम, आदिवासी यांचा एकही प्रतिनिधी नसल्याने या घटकांत नाराजी असल्याचे निदर्शनास आल्यावर थोरात यांनी, हा माझा विषय नाही.परंतु ही बाब गंभीर आहे, योग्य ठिकाणी मांडू, असे उत्तर दिले.
Sanjay Raut: मोठी बातमी! राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी