कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी सिकंदरला दिला मोठा सल्ला; म्हणाले…

Aslam Qazi, the king of wrestling, gave great advice to Sikandar; said…

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होऊन बरेच दिवस उलटून गेले आहेत. परंतु अजूनही सोशल मीडियावर सिकंदरची ( Sikandar Shekh) चर्चा आहे. उपांत्य फेरीत सिकंदर शेखच्या झालेल्या पराभवाने राज्यात वादाची ठिणगी पडली आहे. सिकंदर शेख मुस्लिम असल्यामुळे या स्पर्धेत ( Maharshtra Kesari 2023) त्याच्यावर अन्याय करण्यात आला आहे. असा आरोप सगळीकडून केला जात आहे. सिकंदरच्या कुटूंबियांनी देखील याबाबत गंभीर आरोप केले आहेत.

धक्कादायक! तरुणाने विवाहितेवर केला बलात्कार वरून म्हणाला की, आमचे हेच काम आहे…

या पार्श्वभूमीवर कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ” सर्व धर्माचे पैलवान तालमीत जाऊन व्यायाम करताना, बजरंग बलीच्या पाया पडून व्यायाम सुरू करतात. त्यानंतर ते कुस्तीचा सराव करतात. त्यामुळे पैलवानांना कुठलीही जात नसते. मागच्या दहा वर्षात मी सतत कुस्त्या जिंकल्या. मात्र, जातीचे राजकारण कुठेही झाले नाही. असे ते म्हणाले आहेत.

“महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व..”, संजय राऊतांचे शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत सूचक ट्विट

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर आपण स्वतः सिकंदरला फोन करून त्याची समजूत काढली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. सिकंदरने त्याची हार मान्य करायला हवी. नव्या जोमाने तयारी करून या स्पर्धेत पुन्हा एकदा उतरून त्याने महाराष्ट्र केसरी व्हावे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये काहीतरी दोष आहे. मात्र, ती अनावधानाने झालेली चूक आहे. मुस्लिम असल्यामुळे सिंकदरला हरवलं गेलं किंवा डावलले गेले असे म्हणणे चुकीचे आहे. कारण, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जातीचा आधार घेतला जात नाही. असे मत अस्लम काझी यांनी मांडले आहे.

अशी झाली लक्ष्या आणि महेशची दोस्ती! कोठारेंच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आठवणींना उजाळा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *