
मागील काही दिवसांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान सोशल मीडियावरील अशाच प्रकारच्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ जालन्यातील डांबरी रस्त्याच्या कामाचा आहे. जालन्यातील या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. तो रस्ता हाताने देखील गुंडाळता येऊ शकतो अशी त्या रस्त्याची अवस्था आहे. या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे रस्त्याच्या कामातल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची पोल खोलली आहे.
मोठी बातमी! दहावीचा निकाल जाहीर, एका क्लीकवर पहा तुमचे मार्क
पोखरी-कर्जत येथील रस्त्याचे काम चालू आहे. परंतु या बहादराने इतकं बोगस काम केलंय की रस्ता हाताने गुंडाळता येतोय. डांबरीकरण झालेल्या या रस्त्याच्या खालच्या भागात कारपेट आढळून आले आहे. त्या परिसरातील स्थानिकांनी कारपेटसहीत रस्ताच उचलून दाखवत त्या अधिकाऱ्यांची पोल खोलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awad) यांनी देखील या भ्रष्टाचाराची गंभीर दखल घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. गावकऱ्यांनी तात्काळ कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
लग्नात घडला भयानक प्रकार, वऱ्हाडी थेट नवरीला घेऊनच पळाले; घटना वाचून बसेल धक्का
“महाराष्ट्र सरकारने ‘भ्रष्टाचारी तंत्रज्ञानात’ खूपच कमी कालावधीत भरपूर प्रगती केली आहे. त्यांनी केवळ 10 महिन्यांत ‘फोल्डिंगचा रस्ता’ बनवून वेगळेच तंत्र शोधून काढले आहे. ह्या अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही दिवसांमध्येच आपल्याला घडी घालता येतील असे रस्ते पहायला मिळतील. असं टीकास्त्र आव्हाडांनी सोडलं आहे. या रस्त्याला बांधून एक महिन्याच झाला आहे. त्या रस्त्या बांधणीसाठी तब्बल 67 लाख रुपये खर्च केले आहेत.
“काहीच न मिळाल्यास ऊस तोडायला जाऊ”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात तातडीने बैठक बोलावली आहे. ठाण्यातील सर्व कामे एक जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. खड्डेमुक्त वाहतूक व कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सर्व सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर भांडार शहरांमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्यांचे बांधकाम करताना त्यामध्ये माती टाकल्यामुळे रस्त्यांची दूरावस्था होऊन त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश