Assembly Election Results । राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण होणार? या नावाच्या चर्चा सुरु

Assembly Election Results

Assembly Election Results । चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप तीनमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे तर एका राज्यात काँग्रेस. मध्य प्रदेशात भाजपचा बंपर विजय झाला आहे. यावेळी राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही कमळ फुलले आहे. त्याचवेळी तेलंगणात गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या केसीआर यांच्या सरकारला मोठा झटका बसला आहे. तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या चार राज्यांसाठी भाजप किंवा काँग्रेसने आपापल्या मुख्यमंत्री चेहऱ्यांची घोषणा केलेली नाही. आता त्यांच्यापैकी मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आहे. (Assembly Election Results)

Ajit Pawar । भाजपच्या विजयानंतर अजित पवारांकडून पंतप्रधानांची स्तुती, म्हणाले; “ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ”

मध्य प्रदेशात पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री होऊ शकतात. ते राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. शिवराज बुधनी विधानसभा मतदारसंघातून रिंगणात होते. हा मतदारसंघ 2006 पासून त्यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे सध्या त्यांचे नाव चर्चेत आहे. राजस्थानमध्ये भाजप खासदार महंत बालकनाथ हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच अलवरचे खासदार महंत बालकनाथ हे देखील नाथ समुदायातून येतात आणि त्यांच्या संसदीय मतदारसंघात त्यांचे अनुयायी आणि समर्थक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे.

Urfi Javed । उर्फीला बसला मोठा धक्का! इंस्टाग्राम अकाउंट झालं सस्पेंड

त्याचबरोबर राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. अटलबिहार वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळात त्या केंद्रीय मंत्री होत्या. सध्या त्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. त्यांचे देखील नवं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमण सिंह हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानले जात आहेत. 1966-67 मध्ये पक्षाच्या युवा शाखेत सामील होऊन त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 1983 मध्ये ते कवर्धा नगरपालिकेचे नगरसेवक झाले. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे.

Maratha Reservation । “दुसऱ्याच्या ताटातून मराठा समाजाला आरक्षण नको, सर्वपक्षीय बैठकीत असं ठरलेलं”, शरद पवार स्पष्ट बोलले

तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करत 10 वर्ष जुन्या बीआरएस सरकारचा पराभव केला आहे. रेड्डी यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे श्रेय दिले जात असून, दरम्यान त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

Crime News । धक्कादायक! शिपायाने अल्पवयीन मुलीवर केला वारंवार बलात्कार, गर्भवती केलं अन्…

Spread the love