Assembly Elections 2024 । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवार यांनी थेट आकडाच सांगितला

Sharad Pawar

Assembly Elections 2024 । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि NNCP-SP चे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) 225 जागा जिंकेल असा मला विश्वास आहे. (Maharashtra Assembly Elections 2024)

Politics News । ब्रेकिंग! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी एका जागेसाठी जाहीर केला उमेदवार

भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतल्याच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले, “महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) मजबूत करण्याची गरज आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत.

Politics News । भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार, हा बडा नेता राष्ट्रवादीत येणार

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते महाविकास आघाडीत सामील होत असल्याचे चित्र आहे. यापैकी मराठवाड्यातील दोन ते तीन नेत्यांनी भाजप सोडला आहे. माजी गृहमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आज माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का, माजी गृहमंत्र्यांनी सर्व पदांचा दिला राजीनामा

Spread the love