Site icon e लोकहित | Marathi News

Assembly Elections । विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे आणि संभाजी ब्रिगेडमध्ये चर्चा; उमेदवार ठरवण्यावर लक्ष

Manoj Jarange Patil

Assembly Elections । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरवली सराटीला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार, माजी आमदार आणि विद्यमान आमदार आतापासूनच येऊ लागले आहेत. अनेकजण मध्यरात्री आणि पहाटेही गुपचूप भेटण्यासाठी धडपड करत आहेत, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी देखील जरांगे यांची भेट घेतली आहे. या बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Baba Siddiqui murder case । बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पुण्यातून आणखी तिघांना अटक; धक्कादायक माहिती समोर

माजी मंत्री बदामराव पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संभाजी ब्रिगेड आणि मनोज जरांगे यांची भूमिका एकसारखी आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश आणि ओबीसींचे संरक्षण यासंदर्भात दोघांचीही ध्येयं समान आहेत. यामुळे दोन्ही गटांना एकत्र येण्याची संधी आहे. पंडित यांनी सांगितले की, राजकीय पक्षांसह समविचारी लोकांनी एकत्र येऊन आपला झेंडा आणि अजेंडा पुढे आणण्याची गरज आहे. या संदर्भात पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Uddhav Thackeray | ब्रेकिंग! ठाकरे गटाची विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर; शिंदे गटाला थेट आव्हान

आता या दोन गटांमध्ये समन्वय चांगला आहे, परंतु या लोकशाही महोत्सवात स्वतंत्रपणे भाग घेण्याची तयारी संभाजी ब्रिगेडने दर्शवली आहे. जरांगे यांनाही तसंच सूचित केले आहे. मात्र, उमेदवार ठरवण्यासाठी एकत्र चर्चा करणार असल्याचं पंडित यांनी स्पष्ट केलं. समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या योग्य उमेदवारांची निवड महत्त्वाची आहे, याबद्दल दोन्ही गट एकमत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही गटांच्या सहकार्यातून संभाव्य उमेदवार ठरवण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल.

Ajit Pawar । ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदाराने केला अजित पवार गटात प्रवेश

Spread the love
Exit mobile version