Assembly Elections | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दरम्यान सांगली जिल्ह्यात तासगावमध्ये फराळाच्या पाकिटातून पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
Parth Pawar । मी शरद पवार यांना भेटायला जाणार; पार्थ पवार यांचे धक्कादायक वक्तव्य
यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, या प्रकरणात भरारी पथकाने तात्काळ कारवाई केली आहे. तासगावमध्ये रोहित पाटलांच्या दोन कार्यकर्त्यांवर – सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम – गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत.
Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार; उमेदवार उभा करणार नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील याने तासगावमधील साठेनगर येथील मतदारांना दिवाळीच्या फराळासोबत 3000 रुपयांचे पाकीट देत असल्याचे उघड झाले. याबाबत भरारी पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला आणि कार्यकर्त्याकडे पांढऱ्या रंगाच्या 16 पाकिटांमध्ये 1 लाख 8 हजार 500 रुपयांची रक्कम आढळून आली. या रकमेच्या पाकिटांमध्ये प्रत्येकात 3000 रुपये, 500 रुपयांच्या 111 नोटा आणि 5000 रुपये रोख आढळले.
Politics News | राजकारणातून मोठी बातमी! भाजपचा बडा नेता उमेदवारी मागे घेणार का?